शिवसेनेच्या वतीने ठाण्यात फूड पॅकेट्सचे वाटप

ठाण्यात फूड पॅकेट्सचे वाटप



ठाणे


कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर #महाराष्ट्र राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व व्यवहार बंद ठेवणे तसेच नागरिकांना आवश्यकता नसल्यास घरीच राहण्याबाबत आवाहन केले आहे.यामुळे ठाण्यातील बेघर आणि गरजू व्यक्ती उपाशी राहू नयेत याकरिता शिवसेनेच्या वतीने ठाण्यात फूड पॅकेट्सचे वाटप सुरू करण्यात आले आहे


घोडबंदर रोड येथील शिवसेना शाखेच्या वतीने व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली महापौर नरेश म्हस्के, विभाग प्रमुख दिलीप माणिकराव ओवळेकर यांच्या सहकार्याने पानखंडागाव,टक्कारडा गाव,ओवळानाका,बामनालीपाडा,बोरीवडे गाव, वाघबिळ नाका ते फाऊंटन हाॅटेल पर्यंत आज पासून फूड पॅकेट्सचे वाटप सुरू करण्यात आले आहे.३१ मार्च २०२० पर्यंत या फुड पॅकेट्सचे वाटप करण्याचे विचार पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाणे येथे प्रस्तावित केले आहे.उपविभाग प्रमुख चंद्रकांत मुकादम,अरविंद शिंगे,संजय राऊत, चंद्रकांत भोईर ,संजय पाटील ,राजेंद्र पाटील , किरण पाटील,सतीश ठाकूर, कृष्णा भोईर, संदिप भोईर,महादेव राऊत, राजेंद्र जोशी, रोहिणी ठाकूर ,राजू केसरीया,सुनिल रावराणे, आदी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक व युवासैनिक मेहनत घेत आहेत.