आता वसईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात मास्क लावूनच प्रवेश
वसई
करोनाच्या भीतीने वसईच्या सर्व पोलिस ठाण्यांत मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सोमवारपासून पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावून प्रवेश करा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात फलकदेखील लावण्यात आले आहे.
वसईमधील पोलिस ठाण्यांत दैनंदिन कामकाजासाठी तसेच तक्रारींसाठी शेकडो नागरिक येत असतात. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांत सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता वसईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराने आणि भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावूनच प्रवेश करा, असे आवाहन पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. तसेच, याबाबत फलकदेखील पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे.