कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा आंतरमहाविद्यालयीन आय.टी फेस्ट “टेक्नोहोलिक”उत्साहात संपन्न.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा आंतरमहाविद्यालयीन आय.टी फेस्ट “टेक्नोहोलिक”उत्साहात संपन्न.



ठाणे


कर्मवीर भाऊराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या बी.एस.सी.- आय टी विभाग व प्रोडवेअर सोल्युशन प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  “टेक्नोहोलिक” आंतरमहाविद्यालयीन आय.टी फेस्ट शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी,२०२० रोजी महाविद्यालयात संपन्न झाला.सदर आंतरमहाविद्यालयीन आय.टी फेस्टचे हे पहिलेच वर्ष होते.


माहिती तंत्रज्ञानाचे पदवी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सतत अद्ययावत राहणे गरजेचे असते.बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन माध्यमांचा वापर करावा लागतो. याच उद्देशाने  “टेक्नोहोलिक” चे आयोजन करण्यात आले होते.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. नामांकित अशा एसेंचर कंपनीच्या सहव्यवस्थापक सौ. वृषाली रांजाळकर यांनी ‘क्लाउड कंप्युटिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रोडवेअर सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल धाराशिवकर यांनी ‘कॅम्पस-टू-कॉर्पोरेट’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.


“टेक्नोहोलिक” आंतरमहाविद्यालयीन आय.टी फेस्ट मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. बग हंट, क्वेरी फायर, वेब डिझायनिंग व मोबाईल प्रोग्रामिंग अशा चार स्पर्धांमध्ये एकूण १९ महाविद्यालयाच्या ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालय, कळवा ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’  तर डोंबिवलीच्या मॉडेल महाविद्यालयाचा आमल कृष्णा नायर‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ म्हणून पारितोषिकाचे मानकरी ठरले.विजेत्यांना रोख रक्कम रु.१०००/- तसेच प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरविण्यात आले.


संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.एस.सी.- आय टी विभाग प्रमुख प्रा. विजया राणे आणि विद्यार्थ्यांच्या कोअर टिमने “टेक्नोहोलिक” साठी काम केले. प्रा. योगेश राणे व प्रा. मुस्कान चंदनानी यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम केले.


सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.प्राचार्य डॉ. सुनील कर्वे  यांनी प्रास्ताविक केले. समारोपप्रसंगीमुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री. महादेव जगताप, मुंबई विद्यापीठाच्या  बी.एस.सी.- आय टी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. अभिजित काळे, ठाणे महानगर पालिका माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री. स्वरूप कुलकर्णी, मिथिलेश बांदिवडेकर, दुर्गेश पांडे, संस्थेचे सदस्य श्री. गणेश मांजरेकर, आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.