मजुरांना घेऊन जाणारी १० वाहने जप्त
मीरारोड -
रोजदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी मालवाहु वाहनाने चोरी छूपे आपल्या गावी परतीचा प्रवास सुरु केला आहे. मात्र लॉकडाऊन असल्यने पायपीट करत ते गावी जात असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र याचा फायदा काही वाहतुकदार घेत असल्याचे दिसत आहे. अशा मजुरांना पोलिसांची नजर चुकवून त्यांच्या गावी पोहोचवण्याचे काम हे वाहतुकदार करीत असल्याचे बाब समोर आली आहे. भाइंदर व मीरारोड मध्ये असे प्रकार उघडकीस येत आहेत. गेल्या दोन दिवसात पोलीसांनी अशी १० वाहने पकडुन ती जप्त करत गुन्हे दाखल केले आहेत. या वाहनां मधुन सुमारे २५० लोकांसह लहान मुलांने राज्यात तसेच परराज्यात नेले जात होते. सदर १० वाहने पोलीसांनी जपत केली असुन गुन्हे दाखल केले आहेत. तर भा इंदर येथील एका वाहनास वाहतुकीसाठी अधिकार नसताना चक्क एका भाजपा नगरसेवकाने परवानगी पत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावरील सगणाई देवी मंदिर नाका जवळ शनिवारी रात्री तब्बल ६ट्रक व टॅम्पो वाहतुक पोलीस व काशिमीरा पोलीसांनी पकडले. या मध्ये उत्तर प्रदेश, सातारा आदी ठिकाणी जाणारी लोकं लपुन प्रवास करत होती. यात महिला व मुलांचा समावेश होता. नवघर पोलीसांनी भाः इंदर पूर्वेला एक ट्रक उत्तर प्रदेश येथे जाण्याच्या तयारीत असताना तो पकडला. त्यात ३० लोकं व लहान मुलं होती. भा इंदर पश्चिमेला पोलीसांनी एक प्रवासी वाहन पकडले असता त्यात १६ लोकांसह लहान मुलं जालना येथे जाण्यास निघाले होते. सदर लोकं राई- मुर्धा भागातील होती.
शुक्रवारी रात्री मीरारोड पोलीसांनी बेव्ही पार्क नाका दरम्यान अंडी वाहतुक करणारा एक ट्रक पकडला असता ट्रेच्या मागे १९ महिला व १३ पुरुष असे ३२ जण दाटीवाटीने लपुन बसलेले होते. सदर लोकं कर्नाटकच्या बिदर येथे जाणार होते. तर भा इंदर पुर्वेच्या पांचाळ उद्योग भागात मालवाहु ट्रक मधुन सुमारे ३५ जणांना उत्तर प्रदेश येथे नेले जात असताना नवघर पोलीसांनी कारवाई केली.