कोरोना कोवीड 19 बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी हॅास्पीटलची तयारी

कोरोना कोवीड 19 बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी हॅास्पीटलची तयारी
कोरोना विरूद्ध लढ्यासाठी टास्क फोर्स -  महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आदेश



ठाणे


ठाणे शहरामध्ये सापडलेल्या कोरोनाच्या बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आणि त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करून त्यांची तपासणी करण्याबरोबरच शहरामध्ये कोरोना कोवीड 19 बाधीत रूग्णावर उपचार करण्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधांसह रूग्णालय व्यवस्था तयार करण्याचे आणि आवश्यकता भासल्यास एखादे खासगी रूग्णालय अधिगृहित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज दिले.


कोरोना कोवीड 19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांचा समावेश असलेला टास्क फोर्सही निर्माण करण्याबाबत त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना सूचना दिल्या. दरम्यान विलगीकरण कक्षासह शहरातील बेघर आणि स्थलांतरित मजुर, भिकारी आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार यांची प्रभागनिहाय शाळांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा गृहामध्ये तसेच दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथील निवारा केंद्रामध्ये व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
ठाणे शहरामध्ये आतापर्यंत 11 कोरोना बाधीत रूग्णांची नोंद झाली असून या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आणि त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करून त्यांची तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखालील यंत्रणा कार्यान्वित करावी व त्याचा अहवाल रोजच्या रोज मुख्यालयाला सादर करावा असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी वैद्यकीय अधिकारी, संबंधित प्रभागाचा सहाय्यक आयुक्त यांनी परिमंडळ उप आयुक्तांच्या संनियंत्रणाखाली समन्वयाने काम करावे असे सांगितले.
दरम्यान भविष्यातील निकड लक्षात घेवून शहरामध्ये कोरोना कोवीड19 बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधानियुक्त रूगणालय तयार करण्यात यावे. या रूग्णालयाची क्षमता, त्यासाठी आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्स, औषधे याची यादी तयार करून ते प्राधान्याने करून घेणेत यावे अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांना दिल्या. आवश्यकता भासल्यास यासाठी खासगी रूग्णालये अधिगृहित करण्याचे आदेशही दिले. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने कासारवडवली, भायंदरपाडा आणि कल्याणफाटा येथे तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये आवश्यक असणा-या खाटा, गादी, पाणी, बकेटस्, भोजनाची सुविधा यांचाही आढावा घेवून काही कमतरता असल्यास तातडीने त्याची पूर्तता करण्यात यावी असे सांगितले.
शहरातील बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे काम करीत असलेल्या मजुरांसाठी संबंधित व्यावसायिकांनी काय व्यवस्था केली आहे, त्यांना पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळतात का, विलगीकरणाची व्यवस्था आहे का किंवा त्याठिकाणी सोशल डिस्टंन्स पाळले जात आहे का याची माहिती शहर विकास विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सादर करावी असेही त्यानी स्पष्ट केले.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image