आता गर्दीतही ओळखता येणार गुन्हेगारांचा चेहरा

हरावला व्यक्ती, फरार आरोपीचा शोध घणसीवादल मध्यरत्वमागावरील ___ मुंबई : बंगळुरू, भुसावळ आणि मनमाड स्थानकांनंतर मुंबईत चेहऱ्याची ओळख पटविणारी यंत्रणा (फेशिअल रेकॉगनिएशन सिस्टीम) बसविण्यात येणार आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाईल. या यंत्रणेमळे हरविलेली व्यक्ती, फरार आरोपींचा शोध घेणे सोपे होईल. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने हा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरून दररोज ४६ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान रोजच वेगवेगळे गुन्हे घडतात. सध्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण ३ हजार १४० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. आता या सीसीटीव्ही कॅमेत्र्यांमध्ये फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचा समावेश करून नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्याद्वारे या कॅमेत्र्यांमध्ये होणाऱ्या रेकॉर्डिंगचा वापर चेहरे ओळखण्यासाठी केला जाईल. चेहऱ्याची ओळख पटविणाऱ्या यंत्रणेची सर्व कामे नियंत्रण कक्षातन केली जातील. या यंत्रणेत संबंधित व्यक्तीचा फोटो अपलोड केल्यावर, ती व्यक्ती कोणत्या दिवशी कोणत्या स्थानकावर होती, याची इत्थंभूत माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळेल. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे ३० ते ४० मीटर अंतरावरील सर्व चेहरे स्कॅन केले जातील. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याच्या नोंदीठेवल्या जातील. सुरक्षेला अधिक बळकटी येण्यासाठी चेहरा ओळखणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. यासह घाटकोपर स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेता गर्दीच्या नियोजनासाठी येथे विशेष पथक तयार केले आहे असे अश्रफ के. के. यांनी सांगितले आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image